25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रगडकिल्ल्यांवर दारू पिऊन जाल तर खबरदार

गडकिल्ल्यांवर दारू पिऊन जाल तर खबरदार

वाघनखांच्या उद्घाटन प्रसंगी अजित पवारांची नव्या कायद्याची घोषणा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली वाघनखे साता-यात ठेवण्यात आली आहेत. आज साता-यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या वाघनखांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमादरम्यान बोलताना राज्यचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गड किल्ल्यांबद्दल मोठी घोषणा केली.

अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे, वाघनखांबाबत मागील अनेक दिवस चर्चा सुरू आहे. काही चागले घडत असेल तर काही जन टीका-टिप्पणी करतात, जे टीका करतात ते लंडनला गेले की कोहिनूर हिरा बघतात आणि वाघनखे बघतात. पण इथे आले की टीका करतात. ही वाघनखे प्रेरणादायी अशी वाघनखे आहेत. एकदा का होइना वाघनखे बघा, अफजल खानाचा कोथळा शिवाजी महाराज यांनी त्या वाघनखानी काढला असा सल्ला देखील अजित पावारांनी टीका करणा-यांना दिला.

अजिंक्य ता-याला १० कोटी दिले ते खर्च करा, जवळपास ५०० कोटी रुपये राज्य सरकारने उपलब्ध करून दिले आहेत. पुन्हा येणा-या सरकारमध्ये महायुतीचे सरकार आणावे लागेल, तर कायमच्या योजना आणल्या जातील. काही जण म्हणतात चुनावी जूमला आहे, अरे कशाचा जुमला? हे सरकार सर्व सामन्यासाठी काम करत आहे, अशा शब्दात अजित पवारांनी विरोधकांना खडसावले. महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, माझी लाडकी बहिण योजना आपण दिलेली आहे. पण काहीना काही टीका करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. मध्ये म्हणायचे बहिणीला दिले भावाला काही दीले नाही असा टोला देखील अजित पवारांनी विरोधकांना लगावला. यासोबतच किल्ल्यावर दारू पिऊन जाणा-यांविरोधात कडक कायदा केला जाणार आहे असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR