विशाखापट्टणम : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. उभय संघांमधील पहिला सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने २० षटकात तीन विकेट गमावत २०८ धावा केल्या. भारताला विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने भारताला २०९ धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत तीन गडी बाद २०८ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशने शानदार शतक झळकावले. त्याने ५० चेंडूत ११० धावा केल्या. त्याने ११ चौकार आणि आठ षटकार मारले. इंग्लिशने स्टीव्ह स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारीही केली. स्मिथने ५२ धावांची खेळी खेळली. टीम डेव्हिडने नाबाद १९ धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट १३ धावा करून बाद झाला. मार्कस स्टॉइनिसने नाबाद सात धावा केल्या. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.