झरी : येथील शिवस्वराज्य मित्र परिवाराचे सर्वेसर्वा दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ८०० लेबर कार्ड धारकांना संसारोपयागी साहित्याचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम शिवस्वराज्य मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मधुराज सिंह दीक्षित तर कार्यक्रमाचे उद्घाटक भगवानराव वाघमारे तर प्रमुख पाहुणे म्हणून सुशील देशमुख होते. या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. या उपक्रमासाठी ५ व ६ जुलै रोजी शिवस्वराज्य संपर्क कार्यालय येथे लेबर कार्डधारकांनी संसारोपयोगी साहित्यासाठी नोंदणी केली होती. २ ऑगस्ट रोजी शिवस्वराज्यचे सर्वेसर्वा दिलीपराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यापूर्वी देखील शिवस्वराज्य मित्र परिवाराच्या वतीने ८० लेबर कार्ड धारकांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले होते.
या कार्यक्रमास शिवस्वराज्य मित्र परिवाराचे सर्वेसर्वा दिलीपराव देशमुख, डॉ. प्रमोद देशमुख, दिलीपराव नेते, आप्पासाहेब देशमुख, उत्तम जगाडे, बाबू महाराज पुरी, अतिक इनामदार, संदीप जाधव, कैलास रगडे, बबन मठपती, सखा पाटील, अनिल सावंत, रामदास डोंबे, रंगराव देशमुख, समीर खतीब, अभिजीत परिहार, संतोष देशमुख, अभिजीत देशमुख, ओंकार देशमुख, प्रशांत देशमुख, सतीश, देशमुख, आबासाहेब देशमुख, रुस्तुम वैद्य, काशिनाथ जगाडे संजय सावंत, किशन सावंत, भास्कर जगाडे, सचिन लबडे, मुरली चोरमले, गजानन चव्हाण, सुनील सावंत, कपिल देशमुख सुभाष सावंत आदीसह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती.