22 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री शिंदे महंत रामगिरी महाराज एकाच व्यासपीठावर

मुख्यमंत्री शिंदे महंत रामगिरी महाराज एकाच व्यासपीठावर

नाशिक : प्रतिनिधी
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वक्तव्य केले होते. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून महंत रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली असून ते एकाच व्यासपीठावर दिसून आले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या पंचाळे गावात प्रवचनाच्या दरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने नाशिकसह छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरात तणाव निर्माण झाला होता. गंगागिरी संस्थान गोदावरी धाम मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात संभाजीनगर आणि अहमदनगरमध्ये आंदोलन करण्यात आले.

नाशिक, वैजापूर, येवल्यात रामगिरी महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेटल्याने चर्चांना उधाण आले आहे.

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात सुरू असणा-या हरिनाम सप्ताहाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन भेट देणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR