मुंबई : ज्या प्रकारचं घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं त्याचा अन्त आता जवळ आलेला आहे, असे संजय राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ज्या पद्धतीने पेशव्यांचे राज्य चालू होते शेवटच्या काळात पुण्यात त्या पद्धतीने सध्या फडणवीस किंवा त्यांचे लोक काम करत आहेत.
अनागोंदी, अराजक, लूटमार हे सर्व तीन घाशीराम कोतवाल आहेत. या तीन घाशीराम कोतवालांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे. घाशीराम कोतवालांचा इतिहास काय? हे महाराष्ट्राला आम्ही आता लवकरच सांगू. लूटमार, खोटारडेपणा, अराजक असा तो काळ होता पेशव्यांचा आणि घाशीराम कोतवालांचा.
महाराष्ट्रामध्ये हे असे कोण लागून गेले यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू. महाराष्ट्रावर आम्ही राज्य केलं नाही का? या महाराष्ट्राला शिवसेनेनं तीन मुख्यमंत्री दिले. सत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे हे फडणवीस यांना माहीत नसेल तर त्यांनी या राज्याचे महाराष्ट्राचे महाभारत समजून घ्यावे. या महाराष्ट्रात ही योजना बंद, ती योजना बंद हे जे सूडाचं राजकारण आहे ते फडणवीसांनी सुरू केलेलं आहे. आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही. यांना भीती का वाटते की आमचं राज्य जाईल. ही त्यांची भीती आहे, हरतो आहोत म्हणून ते लोकांना धमकी देत आहेत.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस पडद्यामागून जे करत आहेत कपट, कारस्थान, महाराष्ट्र ते उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाहीत. अशाप्रकारची मानसिकता कोणत्याही चांगल्या सरकारची नसते. नरेंद्र मोदी यांनीसुद्धा काँग्रेसच्या योजनांची नावे बदलून योजना चालवल्या आहेत. नरेंद्र मोदींनी नवीन काहीही केलेलं नाही. काँग्रेसच्या ज्या योजना होत्या या सगळ्या योजना त्यांनी फक्त नावं बदलली आणि त्या चालू केल्या. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे, त्यांचे सरकार जाणार आहे यामुळे. देवेंद्र फडणवीस यांनी आता आपला गाशा गुंडाळायला सुरुवात करावी. महाराष्ट्र, या राज्याची जनता त्यांच्यावर कोणत्या प्रकारचा विश्वास ठेवायला तयार नाही.