21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआमदारांच्या उत्कृष्ट कामगिरीत महाविकास आघाडीची बाजी

आमदारांच्या उत्कृष्ट कामगिरीत महाविकास आघाडीची बाजी

काँग्रेस आमदार अमीन पटेल प्रथम क्रमांकावर

मुंबई : मुंबईतील आमदारांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड प्रजा फाऊंडेशन या संस्थेने नुकतेच जाहीर केले आहे. या रिपोर्ट कार्डनुसार, आमदारांच्या उत्कृष्ट कामगिरीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी बाजी मारली असून, काँग्रेसचे मुंबईतील आमदार अमीन पटेल हे प्रथम क्रमांकावर आहेत, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सुनील प्रभू द्वितीय क्रमांकावर, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड तृतीय क्रमांकावर, भाजपच्या मनीषा चौधरी चौथ्या क्रमांकावर आणि काँग्रेसचे अस्लम शेख पाचव्या क्रमांकावर आहेत.

दरम्यान, आमदारांच्या कामगिरीच्या यादीत तळाशी असलेल्या पाच आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे नवाब मलिक ( १८ टक्के), शिवसेनेचे ( शिंदे ) सदा सरवणकर (२७.२७ टक्के), शिवसेनेचे ( शिंदे) प्रकाश सुर्वे (२९.८२ टक्के), शिवसेनेचे ( शिंदे) दिलीप लांडे (३१.२६ टक्के) आणि भाजपचे राम कदम (३३.०७ टक्के) यांचा समावेश करण्यात आला आहे. २०२४ मध्ये मुंबईतील ३४ पैकी केवळ एका आमदाराने ८० टक्क्यांच्या वर गुण मिळविले आहेत. अमीन पटेल (८२.९२ टक्के), सुनील प्रभू (७८.७१ टक्के), तर वर्षा गायकवाड (७६.५१ टक्के) यांनी नागरी प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडली, असे प्रजा फाऊंडेशन संस्थेने आपल्या रिपोर्ट कार्डमध्ये म्हटले आहे. या रिपोर्ट कार्डसाठी संस्थेने आमदारांची विधानसभेतील कामगिरी लक्षात घेतली आहे.

काँग्रेस पहिल्या क्रमांकावर

आमदारांच्या कामगिरीवरून त्यांच्याशी संबंधित राजकीय पक्षांच्या कामगिरीचा विचार केला, तर काँग्रेसने सर्वाधिक ७२.५६ टक्के मिळवत पहिले स्थान पटकावले. तर, ६०.०८ टक्के मिळवून भाजप दुस-या क्रमाकांवर आहे. तर काँग्रेसचे मुंबादेवी मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल पहिल्या क्रमांकावर आहेत.

काय आहे प्रजा फाऊंडेशनचे रिपोर्ड कार्ड

प्रजा फाऊंडेशन ही एक प्रसिध्द सेवाभावी संस्था आहे, जी १९९७ पासून सामाजिक समस्येवर काम करते. यासोबतच नगरसेवक, आमदार यांच्या कामगिरीसह विविध सामाजिक विषयांवर आपला अहवाल सादर करते. प्रजा फाऊंडेशनने नुकताच २०१९ ते २०२४ च्या १४ विधानसभेच्या ११९ दिवसांच्या कामकाजाच्या आधारावर आमदारांचे रिपोर्ट कार्ड प्रसिध्द केले. ज्यात महाविकास आघाडीच्या आमदारांनी बाजी मारली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR