20 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeमहाराष्ट्रवाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून अपघात

वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून अपघात

शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर केसरकरांचा अजब तर्क

मुंबई : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दीपक केसरकर यांनी एक अजब विधान केले आहे. वाईटातून चांगलं घडायचं असेल म्हणून अपघात झाला असावा असे दीपक केसरकर म्हणाले आहेत. दीपक केसरकरांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची आणि महायुती सरकार अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

महाराजांचा पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त होत आहे असे विचारण्यात आले असता दीपक केसरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हा अपघात आहे. कदाचित वाईटातून काही चांगले घडायचे असेल म्हणूनही हा अपघात झाला असेल.

अरबी समुद्रातील पुतळा उभारणीचे काम काही तांत्रिक गोष्टींमुळे थांबले, त्यामुळे इथे हा पुतळा उभारला गेला. नौदलाला विश्वासात घेऊन पुन्हा या ठिकाणी स्मारक उभारले गेले तर ते चांगले असेल. याबाबत मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. या ठिकाणी आता १०० फुटी पुतळा असावा, असेही केसरकर म्हणाले आहेत.

आता १०० फुटी पुतळा उभारला तर ते यथायोग्य स्मारक ठरेल. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ला जशा व्यवस्था आहेत तशी येथेही झाल्यास चांगले होईल. बोलणारे काम करत नाहीत आणि काम करणारे बोलत नाहीत. १०० फुटी पुतळा उभा राहिल्यास पंतप्रधानांना पुन्हा बोलवता येईल. तो राष्ट्राचा सन्मान असेल, असंही ते म्हणाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR