22 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeउद्योगस्वातंत्र्यापूर्वी बनलेली बोरोलिन क्रीम ठरली किंग

स्वातंत्र्यापूर्वी बनलेली बोरोलिन क्रीम ठरली किंग

उच्च न्यायालयात जिंकली लढाई

नवी दिल्ली : देशाच्या स्वातंर्त्यापूर्वीपासून प्रत्येक घराघरात वापरल्या जाणा-या बोरोलिन क्रीमचे प्रकरण न्यायालयात पोहोचले, तेव्हा न्यायमूर्तींनी हा सुप्रसिद्ध ट्रेडमार्क असल्याचे विरोधकांना सांगितले. १९२१ मध्ये जेव्हा ही क्रीम देशात लाँच झाली, तेव्हा देश ब्रिटिशांच्या हातात होता.

आज दिल्ली उच्च न्यायालयाने बोरोलिनला ट्रेडमार्क कायद्यांतर्गत सुप्रसिद्ध ट्रेडमार्क म्हणून घोषित केले आहे. तसेच, इतर कंपनीला त्यांचा ट्रेड ड्रेस बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘ट्रेड ड्रेस’ म्हणजे उत्पादन किंवा डिझाइन. जे बाजारातील इतर समान उत्पादनांपेक्षा वेगळे असते. कोर्टाने सांगितले की, बोरोलिन ट्रेडमार्कला बाजारात खूप प्रतिष्ठा आणि लोकप्रियता आहे. हे केवळ भारतातच नाही तर ओमान आणि तुर्किये सारख्या इतर देशांमध्येही प्रसिद्ध उत्पादन आहे. न्यायालयाने हा निर्णय फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या दाव्यावर दिला आहे. कंपनीकडे ‘ओव्हर-द-काउंटर’ अँटीसेप्टिक क्रीम बोरोलिनचे मालकी आणि विपणन अधिकार आहेत. ‘बोरोब्युटी’ नावाच्या समान उत्पादनाच्या निर्मिती आणि विक्रीविरोधात कंपनीच्या वतीने खटला दाखल करण्यात आला होता.

बौद्धिक संपदा कायद्याचे केले उल्लंघन
फिर्यादी कंपनीने असा युक्तिवाद केला की सेंटो प्रॉडक्ट्स (इंडिया) ने क्रीमसाठी बोरोलिनचा ‘ट्रेड ड्रेस’ स्वीकारला आहे. हे बौद्धिक संपदा कायद्याचे उल्लंघन होते. न्यायमूर्ती मिनी पुष्कर्णा यांनी या महिन्याच्या सुरुवातीला दिलेल्या आदेशात, ‘बोरोब्युटी’चे सध्याच्या स्वरूपातील उत्पादन आणि विक्रीवर प्रतिबंध घातला आहे. प्रतिवादीला त्याचा ‘ट्रेड ड्रेस’ आणि ट्रेडमार्क बदलण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने प्रतिवादीला दोन लाख रुपये फिर्यादीला देण्याचे निर्देश दिले.

बोरोलिनची सुरुवात कशी झाली?
बोरोलिनची सुरुवात १९२९ मध्ये झाली. त्यावेळी देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. त्यावेळी कोलकाताचे प्रसिद्ध उद्योगपती गौरमोहन दत्ता यांनी जीडी फार्मास्युटिकल्स सुरू केले. देशात आयात होणा-या औषधी उत्पादनांशी स्पर्धा करण्याच्या उद्देशाने हे बाजारात आणण्यात आले. प्रत्येक भारतीयाच्या त्वचेला शोभेल अशी उत्पादने तयार करणे हा कंपनीचा उद्देश होता. हिरव्या रंगात येणारी ही क्रीम जखमा, मुरुम आणि विविध प्रकारच्या समस्यांवर वापरली जाते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR