25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयराहुल गांधींमध्ये भावी पंतप्रधानाचे सर्व गुण; सॅम पित्रोदा यांचा दावा

राहुल गांधींमध्ये भावी पंतप्रधानाचे सर्व गुण; सॅम पित्रोदा यांचा दावा

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींमध्ये भावी पंतप्रधानाचे सर्व गुण आहेत, असा दावा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केला आहे. राहुल गांधी हे त्यांचे वडील राजीव गांधी यांच्यापेक्षा चांगले रणनीतीकार आणि विचारवंत असून, दोन्ही नेते भारताच्या कल्पनेचे रक्षक आहेत, असेही गांधी परिवाराचे निकटवर्तीय सॅम पित्रोदा यांनी शिकागो येथील पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.

राहुल गांधींच्या अमेरिका दौ-याबाबत पित्रोदा म्हणाले की, राहुल गांधी ८-१९ सप्टेंबरला अमेरिकेला येणार आहेत. दौ-यात ते वैयक्तिक पातळीवर वेगवेगळ्या लोकांशी आणि अमेरिकेतील नॅशनल प्रेस क्लबमध्ये माध्यमांशी संवाद साधणार आहेत. यासोबतच ते तज्ज्ञांच्या चमूला भेटतील आणि जॉर्जटाऊन विद्यापीठात संवाद साधतील, असे पित्रोदा यांनी सांगितले. पित्रोदा पुढे म्हणाले की, त्यांनी राजीव गांधी ते पी. व्ही. नरसिंह राव, मनमोहन सिंग, यांसारख्या अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे. ते म्हणाले की, राहुल आणि राजीव यांच्यातील फरक हा आहे की राहुल अधिक बुद्धिवादी, विचारवंत आहे. तर राजीव थोडा जास्त मेहनती होता. त्यांच्याकडे समान डीएनए आहे, त्यांना समान चिंता आहे. उत्तम भारत घडवण्यावर त्यांचा खरा विश्वास आहे. त्यांच्या कोणत्याही मोठ्या वैयक्तिक गरजा नाहीत, असे ते म्हणाले.

राहुल गांधींची बदनामी करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्सचा खर्च : पित्रोदा
राहुल गांधींची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली. त्यांची बदनामी करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च करण्यात आले. माध्यमांमध्ये राहुलची प्रतिमा नियोजनबद्ध प्रचारावर आधारित होती. राहुल खूप शिकलेला आहे. त्यांना आयुष्यात दोन मोठ्या वेदनांना सामोरे जावे लागले. पहिला त्याच्या आजीच्या मृत्यूचा आणि दुसरा त्याच्या वडिलांच्या मृत्यूचा, असे पित्रोदा म्हणाले. आमच्या संस्थापकांनी ज्या भारताची कल्पना केली होती ती एकत्रितपणे घडवणे हे आमचे काम आहे. राहुल गांधींची प्रतिमा अखेर तशी बनत आहे. भारत जोडो यात्रेने यासाठी मदत केली आहे, असेही पित्रोदा म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR