सेलू : शासकीय बाल चित्रकला स्पर्धा २०२४ या राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धेत नूतन विद्यलाय सेलूचा पार्थ चौधरी याने चौथ्या गटात जिल्ह्यातून प्रथम तर तिस-या गटात कु. सान्वी शितळे हिने दुसरा क्रमांक प्राप्त केला आहे.
शासकीय बाल चित्रकला स्पर्धा दि.१३ ऑगस्ट रोजी परभणी जिल्ह्यात विविध केंद्रावर व नियुक्त शाळेत संपन्न झाल्या होत्या. या स्पर्धेतील जिल्हास्तरीय उत्कृष्ट कलाकृतींची निवड शिक्षण विभाग जि.प.परभणी येथे दि.१२ सप्टेंबर रोजी करण्यात आली. ही निवड शिक्षणाधिकारी ( माध्य.) आशा गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप शिक्षणाधिकारी गणराज यरमळ, शिक्षण विस्तार अधिकारी गोविंदराव मोरे, नव निर्वाचित सांखिकी अधिकारी कोकुलवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.
याप्रसंगी कलाध्यापक तथा मुख्याध्यापक दिलीप सोनकवडे, कलाध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष माधव घयाळ, परभणी जिल्हा समन्वयक तथा जिल्हाध्यक्ष केशव लगड यांनी परीक्षण करून प्रत्येक गटात १५ उत्कृष्ट कलाकृती अशा एकूण ४ गटातील ६० कलाकृती निवडल्या आहेत. या कलाकृतींना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सचिव, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. या यशाबद्दल पार्थ चौधरी, सान्वी शितळे यांचे संस्था पदाधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांना कलाशिक्षक आर डी कटारे, फूलसिंग गावित यांचे मार्गदर्शन लाभले.