हैदराबाद : दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता चिरंजीवी कोनिडेला यांचा भारतीय सिनेविश्वातील सगळ्यात सुप्रसिद्ध सिने अभिनेते म्हणून सन्मान करण्यात आला. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेतर्फे हा सन्मान करण्यात आला असून हैद्राबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सोहळा पार पडला. चिरंजीवी यांना गेल्या वर्षी भारतातील दुस-या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण देऊन गौरविण्यात आलं होतं. त्यांना यापूर्वी २००६ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी १५६ चित्रपटांमध्ये ५३७ गाण्यांमध्ये २४,००० हून अधिक डान्स परफॉर्मन्स केले आहेत. विशेष म्हणजे २२ सप्टेंबर हा तो दिवस आहे जेव्हा त्यांनी तेलुगू इंडस्ट्रीमध्ये १९७८ मध्ये पदार्पण केले होते.