नागपूर : प्रतिनिधी
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विदर्भात मोठे यश मिळाले. एकट्या विदर्भात १० पैकी ७ ठिकाणी महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळविले. आता ठाकरे गटाने पूर्व विदर्भातील २८ पैकी १४ जागांवर दावा केला आहे. त्यामुळे जागावाटपावरन आघाडीत वाद होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव हे सध्या विदर्भाच्या दौ-यावर आहेत. नुकताच त्यांनी पूर्व विदर्भातील पदाधिका-यांसोबत आढावा बैठक घेतली. पूर्व विदर्भातील २८ विधानसभा मतदारसंघाचा शिवसेना ठाकरे गटाने आढावा घेतला. यातील ८ ते १० जागांची आमची मागणी असल्याचे वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी केले. यात नागपूर जिल्ह्यात ५ जागांवर दावा केला असून रामटेक, कामठी, उमरेड आणि शहरातील नागपूर दक्षिण आणि नागपूर पूर्वचा समावेश आहे.
दरम्यान, उद्या उद्धव ठाकरे नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वरला येणार आहेत. यावेळी यासंदर्भात चर्चा होऊ शकते. दरम्यान, सोबतच मी बरीचशी काम पितृपक्षात करतो. उद्या जर यादी जाहीर झाली तरी अशुभ असेल असे मी तरी मानत नसल्याचेही आमदार भास्कर जाधव म्हणाले. सोबतच मी बरीचशी काम पितृपक्षात करतो. उद्या जर यादी जाहीर झाली तरी अशुभ असेल असे मी तरी मानत नसल्याचेही आमदार भास्कर जाधव म्हणाले.