30 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeसोलापूरमनसे कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

मनसे कामगार सेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

सोलापूर : प्रॉव्हीडंट फंड कार्यालयातील कर्मचार्‍यांनी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात पाठपुरावा करताना कामगार प्रतिनिधी श्रीधर गुडेली यांच्याशी दुर्वतन केल्याने कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी मनसे कामगार सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आंदोलनाद्वारे केली आहे.

मनसे कामगार संघटना सातत्याने कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढते.  पी.एफ. कार्यालय कर्मचारी महिला कामगारांना हेलपाटे मारण्यास लावत असतात . पी.एफ. कार्यालय येथे महिला कामगारांना घेऊन त्यांच्या प्रकरणासाठी पाठपुरावा करण्यासाठी श्रीधर गुडेली गेले असता तेथील कर्मचार्‍यांनी गुडेली यांच्याशी अरेरावी व दुर्वतणूक केली.

हे सर्व प्रकरण सीसीटीव्ही फूटेज आहे त्याची पडताळणी करावी व संबंधीत कर्मचार्‍यास बडतर्फ करावे पी.एफ. कार्यालयात असलेल्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्याचे आदेश दयावेत अशी मागणी आंदोलनानंतर जिल्हाधिकार्‍यांना दीलेल्या निवेदनात केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR