ताडकळस : जिल्हा क्रीडा संवर्धन मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये ताडकळस येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा विद्यार्थिनींनी दणदणीत विजय प्राप्त केला.
यांमधे २०० मीटर धावणे स्पर्धेत मुशफिरा वहाब शेख या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला तर ४०० मिटर रिले स्पर्धेत कन्या शाळेच्या मुशफीरा वहाब शेख, गौरी किशन जाधव, गायत्री ओमप्रकाश वळसे, ईश्वरी गोविंद सोळंके व स्वरा लक्ष्मण वडीतवार या विद्याथीर्नींनी प्रथम क्रमांक पटकावला. थाळीफेक खेळामध्ये गौरी किशन जाधव या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला.
उंच उडी खेळामध्ये मुशफिरा वहाब शेखने प्रथम क्रमांक पटकावले. तर स्वरा लक्ष्मण वडीतवार हिने द्वितीय क्रमांक मिळून यश संपादन केले. लांब उडी स्पर्धेमध्ये मुशफिरा वहाब शेख या विद्यार्थीनीने द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादन केले. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक बी.एस.स्वामी यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. या यशाबद्दल मुख्याध्यापक राजकुमार भाग्यवंत, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पद्माकर आंबोरे, विश्वदीप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय जल्हारे, साहेबराव शिंदे, तुकाराम भवरे, सहशिक्षक आनंद कांबळे, संजय सोनकांबळे, सारिका गिरी, श्रीमती शेख राशेद बेगम, अर्चना पुणेकर व अपर्णा पंडित आदींनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. या यशाबद्दल ताडकळस व परिसरातून खेळाडूंवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.