नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू-कश्मीरमध्ये (एनआयए) मोठी कारवाई केल्याची बातमी समोर येत आहे. एनआयएने जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये २२ ठिकाणी कारवाई केल्याची माहिती आहे. जम्मू-कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवाया सुरू असल्याची माहिती एजन्सीला मिळाली होती, या माहितीवरून एजन्सीने कारवाई केली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आज राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला येथील संगरी कॉलनीतील एका घरावर छापा टाकला. याशिवाय एनआयएने दहशतवादी कारवायांचा सुगावा लागल्याने जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्लीसह पाच राज्यांमध्ये २२ ठिकाणांचा शोध घेतला आहे. यापूवीर्ही अनेक दहशतवादी प्रकरणांमध्ये एनआयएने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.