नवी दिल्ली : मिझोराम, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमकरीत्या पक्षाचा प्रचार केला आहे. त्यांनी या पाच राज्यात अनेक निवडणूक सभांना संबोधित केले आहे. आता काँग्रेस नेते राहुल गांधी ८ ते १२ डिसेंबर दरम्यान मलेशिया, सिंगापूर आणि व्हिएतनामच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी सिंगापूर आणि मलेशियामध्ये प्रवासी भारतीयांची भेट घेणार आहेत, तर इंडोनेशियामध्ये ते राजनयिकांना भेटणार आहेत. काँग्रेस नेते व्हिएतनाममध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे.
यावर्षी राहुल गांधी यांनी नॉर्वे, नेदरलँड, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम यासह अनेक देशांना भेटी दिल्या आणि भारतीय प्रवासी लोकांशी संवाद कार्यक्रम आयोजित केला. त्यांनी अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद सत्रेही घेतली. एका वृतानुसार इंडियन ओव्हरसीज काँग्रेस राहुल गांधींच्या सर्व कार्यक्रमांचे संयोजन करणार आहे.