19.3 C
Latur
Tuesday, December 5, 2023
Homeराष्ट्रीयपंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांच्यासह इतर राजकारण्यांनी रविवारी (१२ नोव्हेंबर) जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लोकांना शुभेच्छा देताना पंतप्रधान मोदींनी लिहिले की, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा! हा विशेष सण आनंद, समृद्धी आणि निरोगी आयुष्य घेऊन येवो. याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लिहिले की, “असत्य, अन्याय आणि द्वेषाचा अंधार नाहीसा होवो. आपला भारत सत्य, न्याय आणि प्रेमाने प्रकाशमान होवो, असे राहुल म्हणाले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने दिवाळीच्या शुभेच्छा देताना सांगितले की, माझ्या व काँग्रेस पक्षाच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. दीपांचा हा अनोखा सण तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि कल्याण घेऊन येवो, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR