21 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeराष्ट्रीय६ रबी पिकांच्या हमीभावात वाढ

६ रबी पिकांच्या हमीभावात वाढ

केंद्र सरकारचा निर्णय, मोफत तांदूळ योजनेला मुदतवाढ
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली. या मंत्रिमंडळ बैठकीत शेतक-यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून गहू, मोहरीसह ६ पिकांच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी गत बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत पोषणतत्वांनी संपन्न असा तांदूळ मोफत देण्यात येतो, त्यास आणि इतर कल्याणकारी योजनेंतर्गत मुदत जुलै २०२४ वरून डिसेंबर २०२८ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारच्या या योजनेमुळे ८० कोटी पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ६ पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये गव्हाच्या हमीभावात १५० रुपयांची वाढ तर मोहरीच्या हमीभावात ३०० रुपयांची वाढ करण्यात आली. यासोबतच जवसाच्या किमतीत १३० रुपयांनी, हरभ-याच्या किमतीत २१० रुपये, मसूरच्या किमतीत २७५ रुपयांनी आणि करडईच्या किमतीत १४० रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली. महाराष्ट्रातील गहू उत्पादक आणि हरभरा पीक घेणा-या शेतक-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील शेतक-यांना लाभ होणार आहे.

रबी पिकांच्या हमीभावात वाढ
वाण : प्रतिक्विंटल नवा दर
गहू : २ हजार ४७५
मोहरी : ५ हजार ९५०
जवस : १ हजार ९८०
हरभरा : ५ हजार ६५०
मसूर : ६ हजार ७००
करडई : ५ हजार ९४०

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR