परभणी : अवैध धंद्याची माहिती काढून रामपुरी बीट हद्दीत पेट्रोलींग करत असताना रामपुरी ते मंगरूळ जाणा-या रस्त्याच्या बाजूस काही इसम पत्यावर पैसे लावून अंदर बाहर नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मानवत पोलिसांना मिळाली होती. या ठिकाणी छापास मारला असता रोख ७ हजार ५६० व ४ मोटार सायकल असा एकूण २ लाख ७ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्यात जुगार खेळणा-या ६ जणांना पकडण्यात आले असून मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मानवत पोलिस स्टेशनचे ठाणेदार स.पो. नि. संदीप बोरकर यांचे सूचनाप्रमाणे पो.उप.नी. अनिल खिल्लारे, भारत नलावडे, महेश रणेर, विजय लबडे यांनी रामपुरी बीट हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहिती नुसार रामपुरी ते मंगरूळ जाणा-या रस्त्यावर छापा मारला असता तिथे ५२ पत्ते तसेच ७ हजार ५६० रुपये नगदी व ४ मोटार सायकल असा एकूण २ लाख ७ हजार ५६० रूपयांचा मूद्देमाल जप्त केला. यावेळी गोलाकार बसून जुगार खेळणारे लक्ष्मण रामदास घुंगासे, मिलिंद कोंडीराम घटे, विठ्ठल किशन घटे, रवी देविदास पिंगळे, विष्णू गंगाराम करकडे, वसंत शंकरराव गायकवाड सर्व राहणार रामपुरी यांना पकडून त्यांच्याविरुद्ध पो. उपनि खिल्लारे यांनी दिलेल्या फियार्दी वरून मानवत पो.स्टे. येथे गुन्हा दाखल झाला आहे. तपास रामपुरी बिटचे अमलदार भारत नलावडे करीत आहेत.