26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeपरभणीस्वीपच्या वतीने शाळा महाविद्यालयातून मतदान जनजागृती

स्वीपच्या वतीने शाळा महाविद्यालयातून मतदान जनजागृती

परभणी : जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, निवडणूक विभाग उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते, विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा ज्येष्ठ अधिव्याख्याता गणेश शिंदे, उपशिक्षणाधिकारी गणराज येरमळ यांच्या नियोजनातून स्वीप पथक शाळा-महाविद्यालयातून मतदार, नवमतदार, भावी मतदार यांच्यामध्ये मतदान जनजागृती करत आहेत.

शहरातील वकील कॉलनी येथील पी. डी. जैन होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय दाभाडे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपशिक्षणाधिकारी गणराज येरमळ, डॉ. सिद्धार्थ पैठणे, डॉ. मंजूषा नरवाडकर, सर्व प्राध्यापक, स्वीप सदस्य आंिदची उपस्थिती होती. यावेळी मतदान राष्ट्रीय कर्तव्य असून ते करावेच असे लघुनाटिकातून प्रवीण वायकोस, मतदान सर्व श्रेष्ठ दान आहे असे महेश देशमुख यांनी गीतातून सांगितले.

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा असे डॉ. विजय दाभाडे यांनी सांगितले. प्रत्येकाने आपली जबाबदारी, कर्तव्य, हक्क समजून घेत आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी मतदान करा असे उपशिक्षणाधिकारी गणराज येरमळ यांनी सांगितले. प्रश्नमंजूषा प्रा. प्रवीण लोणारकर यांनी घेतली. उपस्थित विद्यार्थ्यांसह सर्वांना मतदानाची शपथ हनुमंत हंबिर यांनी दिली. प्रस्ताविक त्र्यंबक वडसकर यांनी तर आभार रामप्रसाद अवचार यांनी मानले.

यशस्वीतेसाठी स्वीप सदस्य बबन आव्हाड, अतुल सामाले, संजय पेडगावकर, वैभव पुजारी, अरविंद शहाणे, प्रा. भगवान काळे, प्रफुल्ल शहाणे, मोहन आल्हाट, ज्ञानेश्वर पाथरकर, सर्व स्वीप सदस्य आदिनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR