35.8 C
Latur
Friday, May 2, 2025
Homeमहाराष्ट्रवसंतराव देशमुख यांना घेतले ताब्यात

वसंतराव देशमुख यांना घेतले ताब्यात

जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य

अहिल्यानगर : प्रतिनिधी
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सकाळी पुणे येथील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले.

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सभेत देशमुख यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले. या प्रकरणी देशमुख यांच्या विरोधात संगमनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून देशमुख हे फरार होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने देशमुख यांना पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR