29.2 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeसोलापूरसमाजाने उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे : डॉ. फारूकी यांचे मत

समाजाने उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे : डॉ. फारूकी यांचे मत

सोलापूर : मुस्लीम समाजाने उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्या करिता नियोजन करावे व इंग्रजी व मातृभाषेकडे उर्दू भाषेला समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. उर्दू भाषा व साहित्य समृध्द करण्यात प्रत्येक साहित्यिकांनी आपली जबाबदारी मोठ्या जबाबदारीने पाडत आहेत आणि त्यातही सोलापूर हे उर्दू जतन करण्यासाठी नेहमी पुढे आहे असे गौरवोद्गार अमेरिका येथील उर्दू साहित्यिक डॉ. अब्दुल कादर फारूकी यांनी भारतीय उर्दू विकास फौंडेशन आयोजित जश्ने फारूकी या कार्यक्रमात काढले उर्दूचे ज्येष्ठ कवी साहित्यिक व बनारस विद्यापीठचे उर्दू विभाग प्रमुख प्रा. डॉ. आफताब अहमद आफाकी यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या या कार्यक्रमात मंचावर उर्दू फाऊंडेशनचे संस्थापक सुलतान अख्तर, स्वागताध्यक्ष अय्यूब नल्लामंदू, अर्शद सिद्दीकी, डॉ. शब्बीर इक्बाल, नदीम मिर्जा, इरफान नादीर, सलीम रिलाईन्स, डॉ. रशीद शेख उपस्थित होते.

महेवीश शेख ने कुराण पठण केले तर सुलतान अख्तरने प्रस्ताविक करत कार्यक्रमाचे महत्व विषद केले तर स्वागताध्यक्ष अय्युब नल्लामंदू यांनी सर्वांना शाल बुके देऊन स्वागत केले. या नंतर अमेरिकेतील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अब्दुल कादर फारुकी यांच्या बदल प्रा. गुलाम साकीब यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आफताब आफाकी म्हणाले उर्दू भाषा ही मुस्लीमाची भाषा नाही ही भारतीय भाषा आहे. याला जतन करण्यासाठी आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीला सर्वजण प्रामाणिकपणे पार पाडावे. यानंतर कथाकार शकील शेख, कवी प्रा. गुलाम साकीब यांचा सत्कार अख्तर हुसेन व सादिक हकीम यांनी विशेष सत्कार केले.

या वेळी सुलतान अख्तर यांची जÞावीया निगाह , नजीर ब-नाम सुलतान, अर्शद सिद्दीकी यांची हुरफ – हुरफ पहरन, प्रा. गुलाम साकीब यांची अदबी सलतन का वारीस, शकील म शरीफ शेख यांची सरगोशीयाँ आणि सूफी शम्सुल जुहा यांची चिरागे तरीकत या सहा पुस्तकांचा प्रकाशन सर्व उपस्थित मान्यवरांचे हस्ते झाले. या नंतर ज्येष्ठ साहित्यिक डॉ शब्बी इक्बाल, अर्शद सिद्दीकी, अयूब नल्लामंदू, इरफान सय्यद यांना गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

अर्शद सिद्दीकी व नदीम मिर्जा यांच्या अध्यक्षते खाली लघु कथा व कवी संमेलन संपन्न झाला. या कार्यक्रमात लघु कथाकार शकील शेख औरंगाबाद, चाँद अकबर कलबुर्गी, अन्वर कमिशनर, गुलाम साकीब, सुलतान अख्तर आणि कवी नदीम मिर्जा , मीर अफजल मुख्तार अहमद काँट्रॅक्टर, शफी शतारी, शाहीन शकील सदफ, अर्शद सिद्दीकी मुख्तार अहमद दरवनी, राशीद रियाज कलबुर्गी, तवाब अन्सारी, शादाँ पितापूरी, अब्दुल शुकूर शऊर, गुलाम साकीब आपली कथा व कविता सादर करून वाह वाह मिळविली.

मुशायरेचे सुत्र संचलन तवाब अन्सारी , आणि कार्यक्रमाचे सुत्र संचलन प्रा. डॉ. रशीद शेख यांनी केले तर आभार अय्युब नल्लामंदू यांनी केले. यावेळी अख्तर हुसेन, महेमूद नवाज, जावीद काजी, चाँद अकबर, तज्जमुल हुसेन चांदा, साहिर नदाफ, सादिक हकीम, शमीम चांदा, अलीमोदीन दंडोती, इरमसबा नल्लामंदू अन्वर कमिशनर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR