27.6 C
Latur
Friday, November 22, 2024
Homeधाराशिवमोटे-पाटील यांच्या एकीच्या बळाने सावंतांचा तंबू भेदरला

मोटे-पाटील यांच्या एकीच्या बळाने सावंतांचा तंबू भेदरला

बाजार समिती, सोसायटी निवडणुकीतील फॅक्टरची विधानसभेत पुनरावृत्ती होणार

धाराशिव : जिल्ह्यात चारही विधानसभा मतदार संघात जोरदार निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू आहे. त्यात भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात राज्याचे आरोग्यमंत्री राहिलेले तानाजी सावंत हे निवडणूक रिंगणात आहेत.

त्यांनी मागील पाच वर्षांत केलेल्या वाचाळ शब्दामुळे या मतदार संघातील मतदारराजा त्यांना धडा शिकवण्यासाठी वाट बघून आहे. ती वेळा आता आली असून त्याचा दणका त्यांना या विधानसभा निवडणुकीत देण्याच्या तयारीत या मतदार संघातील मतदार आहेत. या मतदार संघात मागील झालेल्या बाजार समिती व परंडा सोसायटी निवडणुकीत एकेकाळचे विरोधक राहिलेले राहुल मोटे व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा गट एकत्र आल्याने सावंतांना निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.

त्याच निवडणूकीत पुनरावृत्ती सध्या होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत निश्चित मानली जात आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राहुल मोटे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांची साथ आहे. हे दोघे एकत्र आल्याने वाचाळवीर सावंत यांच्या तंबू अक्षरशा भेदरला असून आता मतदारांकडे गयावया विनंती करू लागला आहे. मात्र मतदारराजा आता त्यांचे ऐकण्याच्या तयारीत नाही. धडा शिकवण्याच्या तयारीत असून बाजार समिती व सोसायटी ही निवडणूक ट्रायल होते, आता विधानसभा ही निवडणूक म्हणजे पिक्चर अभी बाकी है अशा भूमिकेत मतदारराजा असल्याचे दिसून येत आहे.

मागील पाच वर्षात सावंत यांनी आमदारकी मिळाल्यापासून स्वत:हाच्या मतदार संघात वेळ दिला नाही. त्यानंतर तर राज्याचे मंत्रिपद मिळाल्यावर त्यांना सत्तेची झिंग चढल्याचे दिसून आले. धाराशिव जिल्ह्याचे पालकत्व असताना आपला मतदार संघ सोडला तर त्यांनी जिल्ह्यातील इतर तालुक्यात किती वेळ दिला. याबाबत प्रश्न निर्माण होईल, स्वत:च्या मतदारसंघातही नागरिकांना भेट देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता गुत्तेदारी करणारे त्यांचे चेले यांना थेट पुणे येथे गाठून कामे करून घ्यावी लागत होती. मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांनी वा-यावर सोडल्याचे दिसून आले. त्यामुळे आता येथील मतदार राजा जागा झाला आहे.

निवडणुकीत कामे केल्याचे सांगत पैशाच्या जोरावर निवडणूक जिंकता येते. मतदार आमच्या खिशात आहे, असे समजून पाच वर्षात सत्तेबरोबरच पैशाच्या जोरावर मस्ती केली. आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे या मतदार संघातील मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे. केवळ २० तारखेची आपण वाट पाहत असल्याचे मतदारातून बोलले जात आहे. मतदानातून सत्ता आणि पैशाची मस्ती कशी जिरवायची हे आम्हाला चांगलेच ठावून आहे, आता ती वेळ आली असून तसा निर्धार मतदारांनी केला आहे.

स्थानिकच्या नेत्याशिवाय परकीय आलेल्या नेत्याला या निवडणुकीत धुडकावून लावण्याची या मतदारसंघातील मतदारांनी तयारी केली आहे त्यामुळे या निवडणुकीकडे वाचळवीरांच्या राजकारणाला सुरुंग लागणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR