25.8 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeमहाराष्ट्रट्रकमधून ८० कोटींची चांदी जप्त

ट्रकमधून ८० कोटींची चांदी जप्त

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या पथकांकडून राज्यभरात कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी रोकड रक्कम, सोने, चांदी आणि दारूचा साठाही जप्त करण्यात आला आहे. मतदानाच्या चार दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. एका ट्रकमधून ८,४७६ किलो चांदी जात होती. त्याची किंमत तब्बल ८० कोटी रुपये आहे. इतक्या मोठ्या रकमेची चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला आहे. ही चांदी जप्त करण्यात आली आहे.

मानखुर्द पोलिस वाशी चेकनाक्यावर वाहनांची तपासणी करत आहेत. या तपासणी दरम्यान शुक्रवारी रात्री एका वाहनाची तपासणी करण्यात आली. या मोठ्या ट्रकमध्ये पोलिसांना चांदी मिळाली. मोठ्या प्रमाणावर चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला. या चांदीचे वजन करण्यात आले. ती ८,४७६ किलोग्रॅम भरली. त्या चांदीची बाजारातील किंमत ८० कोटी रुपये आहे.

चालकाला घेतले ताब्यात
अधिका-यांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या टीमला घटनास्थळी बोलवले. आता आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. सुरुवातीच्या चौकशीत ही चांदी बेकायदेशीरपणे घेऊन जात असल्याचे समोर आले आहे.

नागपूरमध्ये मोठी कारवाई
नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोने-चांदी, डायमंडचे दागिने आणि इतर साहित्य असा जवळपास १ कोटी ६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुंबईवरून नागपूरला पार्सल आले होते. या प्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR