28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरेंनी खोटी कागदपत्रे सादर केली

ठाकरेंनी खोटी कागदपत्रे सादर केली

शिंदे गटाचा आरोप, अध्यक्षांकडे केली तक्रार

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाकडून खोटी आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याची तक्रार शिंदे गटाने केला आहे. त्यासंबंधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना अर्ज देण्यात आला असून शिवसेना पक्ष कार्यालयातील कम्प्युटर जप्त करण्याची मागणीही केली. शिवसेना १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असून त्यादरम्यान शिंदे गटाने ही मागणी केली.

२२ आणि २३ जूनच्या संदर्भात जे ई-मेल लेटर दिल्याचे ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंनी म्हटले आहे, तो ई-मेल आयडी अस्तित्वातच नसल्याचा युक्तिवाद शिंदे गटाने केला. शिवसेना ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्रे रेकॉर्डवर आणली जात असल्याची अर्जात तक्रार करण्यात आली आहे. विधान भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयातील अनिल देसाई, सुनील प्रभू आणि विजय जोशी यांनी वापरलेले कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट मोबाईल आणि इतर संपर्काची साधने जप्त करण्याची मागणी केली.

अध्यक्षांसमोर ठाकरे गटाकडून बनावट कागदपत्रे सुपूर्द करण्यात आल्याप्रकरणी शिंदे गटाकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाकडून बनावट आणि खोटी कागदपत्रे रेकॉर्डवर आणली जात असल्याची अर्जात तक्रार करण्यात आली. ज्या ई-मेल आयडीवर एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे, तो ई-मेल आयडीही अस्तित्वात नसल्याचा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. या ई-मेल आयडीवर ई-मेल करून बाउन्स बॅक झालेल्या मेलचा रिपोर्टदेखील अध्यक्षांना दिलेल्या पत्रात जोडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR