15.3 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeराष्ट्रीयमणिपुरात दुष्कृत्याचा कळस

मणिपुरात दुष्कृत्याचा कळस

१० महिन्याच्या बाळाचे डोळे काढले कुटुंबातील ६ जणांची हत्या

जिरीबाम : मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील ६ सदस्यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाचा पोस्टमॉटर्म रिपोर्ट आता समोर आला आहे. या रिपोर्टमधून अत्यंत धक्कादायक खुलासे झाले आहेत. ११ नोव्हेंबरला कुकी बंडखोरांची सुरक्षा पथकासोबत चकमक झाली. त्यांनी मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यातून बोरोबेकरा क्षेत्रातून तीन महिला आणि तीन मुलांचे अपहरण केले. त्यांचे मृतदेह नंतर जिरीबाम जिल्ह्याच्या जिरी नदी आणि आसामच्या बराक नदीमध्ये सापडले.

या पोस्टमॉटर्म रिपोर्टमधून हादरवून सोडणारी माहिती समोर आली आहे. आसामच्या सिलचर मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात या मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आले. १० महिन्यांचे बाळ लॅशराम लम्नगानबा उजव्या गुडघ्यामध्ये गोळी लागली होती. त्याचे दोन्ही डोळे काढण्यात आले होते. त्याशिवाय त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. हे सर्व मृतदेह १७ नोव्हेंबरला सिलचर मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात आणण्यात आले होते. रिपोर्टनुसार त्यांच्या मृत्यूची वेळ ३ ते ५ दिवस आधीची होती.

१७ नोव्हेंबरला हे मृतदेह शवागरात आणले, तेव्हा कुजलेल्या स्थितीमध्ये होते. त्याशिवाय थजांगनबी नावाच्या आठ वर्षाच्या मुलीच्या शरीरावर गोळ्यांमुळे अनेक जखमा होत्या. लमंगनबाची ३१ वर्षांची काकी तेलेम थोइबीच्या छातीत तीन आणि पोटात एक गोळी लागली होती. तिच्या डोक्यावर हल्ला करण्यात आला होता. कवटीतील हाडे तुटलेली होती.

शरीराचे अनेक भाग कापलेले
कुटुंबातील तीन अन्य सदस्यांचा पोस्टमार्टम रिपोर्टही तितकाच भयानक होता. तीन वर्षाच्या चिंगखेंगनबा सिंह, २५ वर्षांची एल हेतोनबी देवी आणि ६० वर्षांच्या वाई रानी देवी यांना गोळी मारण्यात आली होती. चिंगखेंगनबा यांचा उजवा डोळा गायब होता. त्यांच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. उजवा हात आणि शरीराचे अनेक भाग कापण्यात आलेले. छातीमध्ये फ्रॅक्चर होते.

हे सर्व मृतदेह नदीत तरंगताना दिसले
एल हेतोनबी देवी यांच्या छातीत तीन गोळ्या मारण्यात आल्या. मुलांची आजी वाई रानी देवी यांना पाच गोळ्या मारण्यात आल्या. एक गोळी डोक्यात, दोन छातीत, एक पोटात आणि एक हातात लागली. मैतेई समुदायाशी संबंधित हे ६ लोक ११ नोव्हेंबरला सुरक्षा पथकं आणि कुकी समुदायात झालेल्या गोळीबारानंतर जिरीबाम येथील शिबिरातून बेपत्ता झाले होते. त्यानंतर हे सर्व मृतदेह नदीत तरंगताना दिसले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR