नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना सिल्कियारा बोगद्याशी संबंधित छायाचित्रांचा संग्रह भेट दिला. चित्राच्या वरच्या बाजूला मिशन सिल्क्यरा लिहिलेले आहे आणि तळाशी बोगद्यातून ४१ मजुरांना बाहेर काढण्याच्या ऑपरेशनशी संबंधित १२ छायाचित्रांचा संग्रह आहे. यातील एका छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण मोहिमेची पाहणी करताना दिसत आहेत. तर दुसऱ्यामध्ये मुख्यमंत्री धामी एका मजुराला मिठी मारताना दिसत आहेत.
उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात १७ दिवस अडकून पडलेल्या ४१ कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांपैकी १५ झारखंडमधील, आठ उत्तर प्रदेशातील, बिहार आणि ओडिशाचे प्रत्येकी पाच, पश्चिम बंगालमधील तीन, आसाम आणि उत्तराखंडमधील प्रत्येकी दोन तर हिमाचल प्रदेशातील एक कामगार होता.