26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयनौदल दिनी सिंधुदुर्गात लष्कर दाखवणार ताकद

नौदल दिनी सिंधुदुर्गात लष्कर दाखवणार ताकद

नवी दिल्ली : १९७१ च्या युद्धादरम्यान कराची बंदरावर केलेल्या साहसी नौदल हल्ल्याच्या “ऑपरेशन ट्रायडंट”ची आठवण म्हणून भारतीय नौदल ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करते. यावर्षी भारतीय नौदल ४ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर ऑपरेशनल प्रात्यक्षिकांसह नौदल दिन साजरा करणार असून सिंधुदुर्गात नौदल दिनी लष्कर आपली ताकद दाखवणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नौदल ४ डिसेंबर २०२३ रोजी भारताच्या पश्चिम सागरी किनार्‍यावरील सिंधुदुर्ग किल्ल्यावर जहाजे आणि विमानांद्वारे नौदल ऑपरेशन्सच्या स्पेक्ट्रमचा समावेश असलेल्या ‘ऑपरेशनल प्रात्यक्षिक’द्वारे आपले कौशल्य आणि क्षमता प्रदर्शित करेल. हा कार्यक्रम अॅडमिरल आयोजित करणार असून या कार्यक्रमाला पीएम मोदीही उपस्थित राहणार आहेत.

सिंधुदुर्ग किल्ला १६६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नौदल दिनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. नौदलाचा एवढा मोठा कार्यक्रम प्रथमच नौदलाच्या तळावर होणार नाही. या कार्यक्रमात मिग २९ के आणि एलसीए ४० विमानांसह २० युद्धनौकांचा सहभाग प्रमुख आकर्षण राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR