27.9 C
Latur
Friday, January 31, 2025
Homeमहाराष्ट्रगुंड थोडेच संप्रदाय चालवतात

गुंड थोडेच संप्रदाय चालवतात

जरांगे, आव्हाड उतरले मैदानात मुंडेंच्या क्लीनचिटवर सणसणीत टोला

जालना/मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच नाही तर राज्याचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वादात उडी घेतल्याने एकच गोंधळ उडाला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि जितेंद्र आव्हाडही मैदानात उतरले असून गुंड थोडेच संप्रदाय चालवतात असा टोला जरांगे यांनी हाणला आहे.

मुंडे यांना टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. तर आता जरांगे यांनी असा सणसणीत टोला लगावला आहे. धनंजय मुंडे गडावर आल्यावर त्यांची मानसिकता जाणून घेतली. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदायचे नुकसान आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांची मानसिकता तशी का झाली याची मीडिया दखल का घेतली नाही? मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही असे भगवंतगडाचे महंत नामदेव शास्त्री म्हणाले.

महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख यांच्या सर्व मारेक-याना शिक्षा व्हायला हवी. ते एक मोठे महंत आहेत. राजकीय लोक डागळेलेले असतात. मात्र मला वाटत नाही ते बोलले असतील. त्यांना दोष देऊन जमणार नाही. जाणारे त्यांना शिकवत असतील की, असे बोला तसे बोला.त्यांना दोष देण्या पेक्षा जो गेला, तो जे करतो तो काही ऐकायला तयार नाही. विकृत पणाने केलेले कार्य याला समाज पाठीशी घालत नाही. समाजात प्रचंड उद्रेकाची लाट तयार झाली तर समाज पाठीशी घालणार नाही, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी मांडले.

महाराज वेगळे आहेत
गुंड थोडेच संप्रादाय चालवतात ? गुंडाचे सहारे घेऊन संप्रदाय चालवतील असे वाटत नाही. हे शिकवले असा संशय येतो. महाराज वेगळे आहेत. बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले असतील तर दुरुस्त करतील. एक बाजू सांगितली तर पटत असते. फास लागायला लागला तर आसे होऊ शकते, असे जरांगे म्हणाले.

आव्हाडांकडून अजित पवार, मुंडेंवर टीका
अजित पवारांच्या भूमिकेवर आता शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली असून बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी परळीत आले असताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे आणि त्यांच्या समर्थकांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या. धनंजय मुंडे यांच्यावर इतके गंभीर आरोप होऊनही अजित पवार यांनी त्यांना अभय दिले आहे. याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘‘पण हा माणूस नशीबवान आहे सगळे होऊनसुद्धा दादा छातीचा कोट करून उभे आहेत. मी किती कमनशिबी आहे. २०१९ मंत्री झालो पालक मंत्री साठी चढाओढ सुरू झाली मला पालघर जिल्हा मिळेल असे मला वाटत होते, पण एकनाथ शिंदे साहेबांनी मला बाजूला घेऊन सांगितले की दादा रायगड जिल्हा सोडत नाहीत माझे तीन आमदार आहेत पण हट्ट धरून बसले आहेत पालघर घ्या, रायगड सोडा आणि दादांनी मला सांगितले शिंदे साहेब पालघर सोडत नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR