28 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeराष्ट्रीयबजेट सादर करण्यापूर्वी विरोधकांचा गोंधळ

बजेट सादर करण्यापूर्वी विरोधकांचा गोंधळ

भाषणापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतापले अखिलेश यादवांना चांगलेच सुनावले

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र अर्थमंत्री सकाळी ११ वाजता लोकसभा सभागृहात पोहचल्या. त्यानंतर बजेट सादर करणार त्याआधीच विरोधकांकडून गोंधळाला सुरूवात झाली. विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. विरोधकांच्या या गदारोळात सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव हेदेखील सहभागी होते. अखिलेश यांच्या वर्तवणुकीमुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला चांगलेच संतापले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अखिलेश यादव यांना अर्थसंकल्प परंपरेची आठवण करून कधीही बजेटच्या वेळी अशाप्रकारे गोंधळ झाला नाही. तुम्ही जे करताय ते योग्य नाही. अखिलेशजी, मी तुम्हाला संधी देतो, परंतु अशाप्रकारे गोंधळ करू नका असं सांगितले. निर्मला सीतारामन बजेट भाषणासाठी तयार होत्या, परंतु विरोधकांना बजेटपूर्वी काही मुद्यांवर चर्चा हवी होती. मात्र सभागृहात बोलू न दिल्याने विरोधकांनी गोंधळ घातला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज देशाचा अर्थसंकल्प सादर करणार होत्या. संपूर्ण देशाचे लक्ष आजच्या बजेटकडे लागले होते. परंतु संसदेत सभागृहात जाण्यापूर्वी अखिलेश यादव यांनी स्पष्ट सांगितले की, सभागृहात आम्ही महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीचा मुद्दा उचलून धरणार आहोत, त्यामुळे अर्थमंत्र्­यांनी भाषणाला सुरुवात करताच विरोधकांकडून या मुद्यांवरून घोषणाबाजी सुरू झाली. त्यात लोकसभेत गोंधळ झाला. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना तुम्ही जे करताय ते योग्य नाही, तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल परंतु बजेट भाषणात व्यत्यय आणू नका असे सांगत खाली बसण्यास सांगितले. मात्र तरीही गोंधळ थांबला नाही.

विरोधकांचा बजेटवर बहिष्कार
या गोंधळात अखिलेश यादव यांच्या नेतृत्वात विरोधकांनी बजेटवर बहिष्कार टाकला. विरोधी खासदारांनी सभागृहातून वॉक आऊट केले. त्यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार त्यांच्या जागेवरच बसले होते. बजेट भाषणाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळाने विरोधी बाकांवरील खासदार पुन्हा सभागृहात आले आणि शांतपणे बजेट ऐकत होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR