28.6 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील कंत्राटदार संपावर

राज्यातील कंत्राटदार संपावर

सरकारने बिले न भागवल्याने निर्णय ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील विकास काम करणा-या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारच्या केलेल्या विकासकामांची जवळपास ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी राहीली असल्याच कंत्राटदार संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारीपासुन आम्ही काम बंद आंदोलन करत असल्याच्या इशारा या संघटनानी दिला आहे.

दरम्यान, राज्यातील पीडब्ल्यूडी इरिगेशन, सामाजिक न्याय आदिवासी विकास विभागाचे कंत्राटदारांचेही पैसे मोठ्या प्रमाणात थकीत असल्याने कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ या दोन ही संघटनांची उद्याला (३) बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील आंदोलनाची रूपरेषा ठरवली जाणार आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे हा फटका बसत असल्याच बोललं जाते आहे. या सर्व विभागांची मिळून तब्बल ८९ हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे पुढे आले आहे.

दरम्यान, जुलै २०२४ पासुन निधी मिळत नसल्याचं या संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारी पासून काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ या दोन संघटनांनी दिला आहे. दरम्यान कंत्राटदारांच्या थकबाकी संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्­यांना आम्ही पत्रव्यवहार करत असतो. मात्र त्यावर तुमचे पत्र मिळालं इतकंच उत्तर येतं. आजवर आमच्या शिष्टमंडळाला चर्चेसंदर्भात अथवा बैठकी संदर्भात कुठलेही आमंत्रण आलेलं नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी दिली आहे.

सर्व बोंबाबोंब : विजय वडेट्टीवार
राज्यातील पीडब्ल्यूडी इरिगेशन, सामाजिक न्याय आदिवासी विकास विभागाचे कंत्राटदारांचेही पैसे मोठ्या प्रमाणात थकीत आहे. कुणालाच पैसे मिळत नाही. सर्व बोंबाबोंब आहे. अ शेतकरी, अंगणवाडी सेविका, जलजीवन मिशन, निराधार योजना, रोजगार हमी योजना कुठेही पैसे मिळत नाही. नुसता बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, अन् याच्यासाठी हे सरकार, अशी परिस्थिती आहे. अस्थिर सरकार महाराष्ट्राने पाहिलेले नाही. अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR