25.7 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeमहाराष्ट्रकुस्तीतील वाद राजकीय आखाड्यात

कुस्तीतील वाद राजकीय आखाड्यात

‘महाराष्ट्र केसरी ’स्पर्धेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी पैलवान शिवराजच्या समर्थनात उतरले पवार, पाटील

अहिल्यानगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला यावेळी गालबोट लागले आहे. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळकडून पराभव झाल्यानंतर निकाल मान्य नसल्याने डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या पैलवान शिवराज राक्षे याने प्रचंड गोंधळ घालत थेट पंचांना लाथ मारली. यानंतर सध्या या कुस्तीच्या निकालावरून प्रचंड गोंधळ सुरू आहे. काही निकाल योग्य असल्याचा बोलत आहे. तर काही राक्षे यांच्यावर अन्याय झालं असल्याचं सांगत आहेत. आता हा मुद्दा आता फक्त कुस्तीच्या आखाड्यापुरता मर्यादित राहिला नसून हा वाद राजकीय आखाड्यात आला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील राक्षे यांच्यावर अन्याय झाला असल्याची प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांनी थेट राक्षे याची बाजू घेत त्यांच्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले आहे.
तर पैलवान शिवराज राक्षे यांनी खरंतर पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होते,असे
वादग्रस्त विधान करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी करत शिवराज राक्षेचे समर्थन केले आहे.

प्रत्येक मल्ल हा प्रतिस्पर्धाचा सन्मान करणारा असतो. अशा परिस्थितीत पंचांना लाथ मारणं हे समर्थनीय नाही, परंतु संतापून लाथ मारण्याची वेळ एखाद्या मल्लावर का येतो? याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का, हेही बघितलं पाहिजे. असे रोहित पवार म्हणाले.

तीन वर्षांसाठी निलंबित करणे अन्यायकारक
शिवाय महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल लोकांना पटला का, हेही बघितलं पाहिजे. मल्ल शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यासह सर्वच मल्ल हे वर्षभर प्रचंड मेहनत घेत असतात आणि एका झटक्यात त्यांना तीन वर्षांसाठी निलंबित करणं हे अन्यायकारक आहे. त्यामुळे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या कारवाईचा पुनर्विचार करावा शिवाय पुन्हा असा प्रकार होऊ नये, याबाबत परिषदेने आत्मपरिक्षण करण्याचीही गरज असल्याचं रोहित पवार म्हणाले.

पंचाला गोळ्या घालायला पाहिजे : चंद्रहार पाटील
पैलवान शिवराज राक्षे यांनी खरंतर पंचाला गोळ्या घालायला पाहिजे होते,असे
वादग्रस्त विधान करत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी करत शिवराज राक्षेचे समर्थन केले आहे. आपल्यावर देखील २००९ मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना अन्याय झाला होता,तसाच अन्याय ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना शिवराज राक्षेवर देखील झाल्याचा आरोप देखील पैलवान चंद्रहार पाटलांनी केला आहे.

शिवराज राक्षेच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
शिवराज राक्षेचं निलंबन करण्यात आल आहे. यावर आता शिवराजच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे. कुटुंबीय म्हणाले, आमच्या मुलावर अन्याय झाला असून पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याने शिवराजला राग अनावर झाला. त्यामुळे केवळ शिवराजवर कारवाई का? पंचांवरही कारवाई करा असा सवाल कुटुंबाने उपस्थित केलाय. तर पंचांवरही कारवाई व्हायला हवी अशी मागणी राक्षे कुटुंबाने केलीये.

अपील न बघता निर्णय : शिवराजचे कोच
हे काका पवारचे पठ्ठा आहे. हा ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा दावेदार होता. त्याने दोन्ही खांदे टेकले असते तर समोरच्याच्या विजय घोषित करण्यासाठी शंभर टक्के स्वत: हात वर करण्यासाठी आलो असतो. त्याने दोन्ही खांदे टेकले असते तर हा पराभूत झाला असता असे आम्ही मान्य केले असते. मी जर अपील टाकलं तर अगोदर माझं अपील चेक करणे आणि नंतर निर्णय देणे, असा नियम आहे. पण पंचांनी न बघता निर्णय देऊन टाकला. समोरच्याचा विजय घोषित केला. शिवराज पूर्ण चीत झाला नव्हता, असे शिवराजच्या कोचचे मत आहे.

शिवराज चांगला पैलवान : पृथ्वीराज मोहोळ
शिवराज राक्षे याने पंच दत्तात्रय माने यांना लाथ मारलेला प्रकार चुकीचा असल्याची प्रतिक्रिया पृथ्वीराज मोहोळ याने दिली. राक्षे हा चांगला पैलवान आहे. पंचांनी मला घोषित केल्यानंतर मी मैदानातून बाहेर पडलो. बाकी मागे काय झाले, याबाबत मी सांगू शकत नाही , अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याने दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR