परभणी: स्व.अॅड. शेषरावजी धोंडजी भरोसे (आबा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ परभणी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, संजीवनी मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ५व्या संजीवनी जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन दि.१४ ते १८ फेब्रुवारी दरम्यान संत तुकाराम महाविद्यालय मैदान वसमत रोड परभणी येथे करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.
संजीवनी जिल्हा कृषी महोत्सवात निरनिराळे ७ दालन उभारण्यात येणार आहेत. हे दालन अत्याधुनिक डोम पद्धतीने उभारले जाणार आहेत. तसेच प्री- फॅब्रिकेटेड स्टॉल्स उभारले जाणार आहेत. या प्रदर्शनात २०० हून अधिक कृषी उत्पादनाचे स्टॉल सहभागी होणार आहेत. या मंडपामध्ये कॉन्फरन्स हॉल देखील उभारण्यात येत असून त्यामध्ये शेतकरी बांधवाकरिता शेती विषयक चर्चासत्र व परिसंवाद, जिल्ह्यातील प्रगतशील शेतक-यांचा गौरव, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कृषी प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञान, बी-बियाणे, सेंद्रीय शेती, पद्धती, गांडूळ खत निर्मिती, पशुखाद्य, ट्रॅक्टर, आधुनिक शेती अवजारे, रासायनिक खते, कृषी मार्गदर्शक पुस्तके, ठिंबक सिंचन, सोलार उत्पादने, महिला बचत गटांची उत्पादने, गृहोपयोगी वस्तू, धान्य महोत्सव असे स्टॉल्स लागणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामुल्य असून जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषी प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
या मंडप उभारणीच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, गुणनियंत्रण अधिकारी सामाले, संयोजक आनंद भरोसे, महेश बेद्रे, डॉ. दिनेश कांबळे, संदीप जाधव, उद्धवराव गायकवाड, पप्पु पवार, शिवप्रसाद लोखंडे, नागनाथ चव्हाण, अंकुशराव पवार, बाळासाहेब पानपट्टे, बाळासाहेब मोहटे, सचिन पाटील, गीता सूर्यवंशी, कल्पना दळवी, बालिका सुरनर, पूजा मोरे, बाळासाहेब गरुड, पांडुरंग चोपडे, दासराव रनेर, तुकाराम कदम, संदीप बोरकर, सुनील खुळे, प्रवीण गायकवाड, व्यंकटी जावळे, अर्जुन भरोसे, नरेश लंगोटे, ऋषिकेश लंगोटे, सुरज चोपडे, संदीप शिंदे, दीपक शिंदे, उमेश घोलप आदी उपस्थित होते.