लातूर : प्रतिनिधी
शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन अंतर्गत सामूहिक विकास योजनेचे विस्तारित केंद्र हरंगुळ (बु.) येथील संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे सुरु करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत दिव्यांगांसाठी फॅशन टेक्नोलॉजी, अकाऊंट टॅली आणि इलेक्ट्रिकल टेक्निशियन असे तीन महिने कालावधीचे अल्प मुदतीचे अभ्यासक्रम १० मार्चपासून सुरु करण्यात आले आहेत. या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. पी. पी. केस्तीकर व एमएसबीटीईचे उपसचिव देवेद्र रमेश दंडगव्हाळ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी अॅड. श्रीराम देशपांडे होते.
संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथ दिव्यांग बांधवांसाठी सामूहिक विकास योजना सुरु करत असून दिव्यांगाना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे आणि दिव्यांग व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा योजनेचा हेतू आहे, असे शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतनचे प्राचार्य सुर्यकांत राठोड यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच दिव्यांगांसाठी प्रशिक्षण विषयक सर्वोतोपरी मदत करु, असे आश्वासित केले.
यावेळी दंडगव्हाळ, न्या. पी. पी. केस्तीकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला केंद्रीय दिव्यांग विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य सुरेश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, सामूहिक विकास योजनेच्या समन्वयक डॉ. अनुराधा यादव, सह समन्वयक सागर जे. बगरे, दिव्यांग आयटीआयचे समन्वयक व्ही.के. गाडेकर, संस्थेचे प्राचार्य आकाश मगर आणि व्यंकट लामजणे आदी उपस्थित होते. र्यक्रम यशस्वीतेसाठी शुभांगी रासुरे, सिद्धांत मंडाळे, मयुर दंडे, रेणुका श्रीमंगले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचलन पुजा पाटील यांनी केले, मगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.