नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपने शानदार विजय प्राप्त केला आहे. संसद भवनात गुरुवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदींचे तिन्ही राज्यांतील विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले. बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा विजय एकट्या मोदींचा नसून सर्व कार्यकर्त्यांचा एकत्रित विजय आहे. बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी खासदारांना आपापल्या भागात जाऊन लाभार्थ्यांशी संपर्क साधावा, लोकांना सरकारच्या योजनांची माहिती द्यावी आणि २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हा आणि कामाला लागा, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी खासदारांना दिला आहे.
या बैठकीला दोन्ही सभागृहातील भाजप खासदार उपस्थित होते. संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पक्षाला महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये काम करण्याचा फायदा झाला आहे. तेथे पक्षाला भरीव यश मिळाले आहे. सर्वांनी मिळून काम केल्याचे पंतप्रधान म्हणाले. भाजपकडे राज्यांमध्ये सरकारची पुनरावृत्ती होण्याचा ५८ टक्के रेकॉर्ड आहे, तर काँग्रेसकडे केवळ १८ टक्के रेकॉर्ड आहे. पंतप्रधान म्हणाले की, सर्व खासदारांनी आपापल्या भागात जाऊन लाभार्थ्यांशी संपर्क साधावा आणि लोकांना सरकारी योजनांची माहिती द्यावी. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हा आणि कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.