39.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeलातूर‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’साठी यशवंत कातळेची निवड

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार?’साठी यशवंत कातळेची निवड

लातूर : लातूर
दयानंद कला महाविद्यालयातील बी.ए. प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या यशवंत कातळे याची सोनी मराठीवरील लोकप्रिय कीर्तनस्पर्धा ‘‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. या यशस्वी निवडीबद्दल महाविद्यालयात त्याचा यथोचित सत्कार प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला.

सत्कार समारंभ प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अंजली जोशी, डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, डॉ. संदीपान जगदाळे, डॉ. गोपाल बाहेती, प्रा. सुरेश क्षीरसागर, प्रा. जिगाजी बुद्रुके,आदी मान्यवर उपस्थित होते.

१४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता यशवंतचे पहिले सादरीकरण टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला आले. या सादरीकरणात तो यशस्वी झाला असून त्याची पुढील सादरीकरणासाठी निवड झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ८,००० कीर्तनकारांनी या स्पर्धेसाठी ऑडिशन दिले होते. त्यामधून केवळ १०८ कीर्तनकारांची अंतिम निवड झाली असून यामध्ये यशवंत याचा समावेश हे विशेष गौरवाचे ठरते.

यशवंत कातळे हा इयत्ता ११ वीपासून दयानंद कला महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याने यापूर्वीही विविध दूरदर्शन वाहिन्यांवर कीर्तन सादर करत आपले नैपुण्य सिद्ध केले आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचे अकाली निधन झाले असतानाही त्याने या दु:खावर मात करत आत्मविश्वासाने स्पर्धेत भाग घेतला आहे.

दयानंद कला महाविद्यालयातून आजपर्यंत २५ विद्यार्थी दूरदर्शन व चित्रपट क्षेत्रात चमकले आहेत. यशवंतच्या निवडीमुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर पडली आहे. यशवंत याला त्याचे वडील कै. नागनाथ कातळे, संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ. संदीपान जगदाळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

उपक्रमाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, पर्यवेक्षक डॉ प्रशांत दीक्षित, तसेच कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR