मुंबई : प्रतिनिधी
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना दिलेली साद आणि त्यावर उद्धव ठाकरेंनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद हे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अशातच आज आणखी महत्वाची बैठक पवार कुटुंबात पार पडली. महिनाभरातवेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त ४ वेळा भेट झाली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंपाठोपाठ आता पवार काका-पुतणेही एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे.
अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजासंबंधीत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शरद पवार आणि अजित पवारांसोबत इन्स्टिट्यूटचे काही अधिकारी देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वेगळी बैठकही झाली. या बैठकीत नेमकी काय चर्चा रंगली? याचं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
पवार कुटुंबातील साखरपुडा कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यावर अजित पवार म्हणाले, ‘साखरपुडा कार्यक्रम हा पुर्णत: पवार कुटुंबाचा वैयक्तिक आणि कौटुंबिक विषय आहे. इतरांनी त्यावर चर्चा करणे योग्य नाही. हा कुटुंबाचा अंतर्गत विषय आहे. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. पवार विविध संस्थात्मक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत असतात. त्यामागील उद्देश नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक प्रगती असतो, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.
राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र बसणे गरजेचं
‘आज पार पडलेली बैठक देखील महत्वाची होती. ज्यामध्ये कृषी आणि शिक्षण क्षेत्रात एआयचा कसा प्रभावी वापर करता येईल, यावर सखोल चर्चा झाली. शेतक-यांना थेट फायदा होईल, अशा तंत्रज्ञानाचा वापर केला जावा, असा ठाम विचार या बैठकीतून समोर’ आल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. तसेच अशावेळी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र बसणे गरजेचं असतं, असंही पवार म्हणाले.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंद : रोहित पाटील
राज्यात उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनाचे वारे वाहत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच सर्व संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रात एक मजबुती निश्चितपणाने येईल,असा विश्वास देखील आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.
आमचे प्रेमही तितकेच : संजय राऊत
शरद पवार आणि अजित पवार यांची या याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, ते एकत्र आलेलेच आहेत. आम्हाला आतापर्यंत कोणाला भेटताना तुम्ही पाहिलात का? बोलताना, चहा पिताना पाहिलत का? एकत्र व्यासपिठावर नाही. आम्ही नाही भेटणार. आमच्याकडे काही वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट नाही. आमच्याकडे रयत शिक्षणसंस्था नाही. आमच्याकडे काहीच नाही आहे. असे आमच्याकडे नाही आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. आमचे प्रेमही तितकेच आहे आणि कडवटपणाही तितकाच असतो आणि त्यात भेसळ नसते.