36.5 C
Latur
Thursday, April 24, 2025
Homeराष्ट्रीयमोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीची शिक्षिकेला चपलेने मारहाण

मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीची शिक्षिकेला चपलेने मारहाण

अमरावती : विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते अनमोल आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हीडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये एक विद्यार्थिनी तिच्या शिक्षिकेवर हल्ला केला आहे. शिक्षिकेने फोन हिसकावून घेतल्यावर विद्यार्थिनीने तिला चपलेने मारायला सुरुवात केली. हा व्हीडीओ पाहिल्यावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

आंध्र प्रदेशातील रघु इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ही घटना घडल्याचे म्हटले जात आहे. एक विद्यार्थिनी आणि शिक्षिकेमध्ये मोबाईलवरून भांडण झाले. यानंतर शिक्षिकेने मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे विद्यार्थिनीला आणखी राग आला आणि तिने चपलेने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.
सोशल मीडियावर व्हायरल होणा-या या व्हीडीओच्या सुरुवातीला एका शिक्षिका आणि मुलीमध्ये वाद सुरू आहे. हळूहळू दोघींमधील वाद इतका वाढतो की विद्यार्थिनी शिक्षिकेकडे बोट दाखवून मोठमोठ्याने भांडू लागते. मग ती सर्वात आधी तिची चप्पल काढते आणि शिक्षिकेला धमकावते आणि तिच्यावर हल्ला करते. ज्यामुळे परिस्थिती बिघडू लागते.

शिक्षिका देखील तिच्यापासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करते, पण यामध्ये तिला अनेकदा मार बसतो. ट्विटरवर हा व्हीडीओ शेअर करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशातील रघु कॉलेजमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष असे कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हीडीओ पाहिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR