32.8 C
Latur
Saturday, April 26, 2025
Homeक्रीडाचेन्नई अद्यापही स्पर्धेत

चेन्नई अद्यापही स्पर्धेत

चेन्नई : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला घरच्या मैदानावर आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला. यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्ध घरच्या मैदानातील विजयानंतर त्यांनी चेपॉकच्या मैदानावर चौथा सामना गमावला आहे. ९ सामन्यात फक्त २ विजयासह चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत ४ गुणांसह सर्वात तळाला आहे. सीएसकेने प्लेऑफ्ससाठी महत्त्वाची असलेली लढत गमावली असली तरी अजूनही ते स्पर्धेत बाद झालेले नाहीत. या पराभवासह स्वबळावर प्लेऑफ्स गाठण्याची शक्यता संपली असली तरी जर तरच्या समीकरणातून त्यांना एक शेवटची संधी असेल.

आयपीएलमध्ये प्लेऑफ्स गाठण्यासाठी १६ ही मॅजिक फिगर आहे. पण ब-याचदा १४ गुणही एखाद्या संघासाठी प्लेऑफ्सचे दरवाजे उघडण्यासाठी पुरेसे ठरू शकतात. त्यासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला आधी उर्वरित ५ सामने जिंकावे लागतील. एवढेच नाही तर धावगतीही उत्तम ठेवावी लागेल. या दोन गोष्टींसह ते १४ गुणांपर्यंत पोहचू शकतात. मात्र एवढ सगळं केल्यावर त्यांना अन्य संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने इथून पुढचा एक जरी सामना गमावला तर त्यांच्यासाठी ही स्पर्धा तिथेच संपेल. कारण उर्वरित सामने जिंकून ते १४ गुणांपर्यंतही पोहचू शकणार नाहीत.

आयपीएलमध्ये १० संघ असताना १४ गुणांसह प्लेऑफ्स गाठण्याचा पराक्रम फक्त एका संघाने करून दाखवला आहे. आरसीबीच्या संघाने गत हंगामात ७ पैकी १४ सामन्यात विजय मिळवून प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारली होती. त्याच पॅटर्नसह सीएसकेला एक संधी असेल. पण त्यासाठी आधी त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. सध्याची चेन्नईची अवस्था बघता हेही त्यांना शक्य होईल असे वाटत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR