32.1 C
Latur
Saturday, April 26, 2025
Homeसोलापूरसोलापुरात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस

सोलापुरात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस

एकास अटक

सोलापूर : ‘पहलगाम’ दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. करमाळा तालुक्यातील शेलगाव वांगी येथे हा युवक राहतो. पहलगाम घटनेच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने समाजाच्या भावना दुखावणे व चिथावणीखोर कृत्य केल्याच्या आरोपाखाली करमाळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फिर्याद दिली. वादग्रस्त स्टेटस ठेवल्याप्रकरणी शेलगाव वांगी येथील अजहर असिफ शेख याच्याविरोधात करमाळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘‘मी राजुरी येथे घरी असताना माझा मित्र नागेश पंडीत वाळुंजकर (रा. शेलगाव वांगी ता. करमाळा) याने मला सांगितले की मोबाईलवर शेलगाव वांगी येथे हिंदू समाजाच्या भावना भडकवणारे कोणीतरी आक्षेपार्ह स्टेटस ठेवले आहे. २५ एप्रिल रोजी सकाळी ०८.४५ मिनिटांनी माझ्या मोबाईलवर सदर स्टेटसचा फोटो मी नागेष वाळुंजकर याच्याकडून मागवून घेतला. त्या स्टेटसच्या फोटोची पाहणी केली. अजहर असिफ शेख रा. शेलगाव वांगी याने त्याच्या मोबाईलवर व्हॉटसअप स्टेटसला आक्षेपार्ह मजकूर ठेवून सामाजिक भावना दुखावून जातीय तेढ निर्माण केला आहे.

अजहर असिफ शेख (रा. शेलगाव वांगी ता. करमाळा) याच्या सोशल मीडियाच्या व्हाट्सअप अकाऊंटवर त्याने काश्मीरमधील पहलगाम येथील दहशवादी हल्ल्याच्या समर्थनार्थ समाजात तेढ व तणाव निर्माण होईल असा मजकूर/स्टोरी स्टेटसला ठेवून दुस-या कोणत्याही वर्गाविरुद्ध किंवा समूहाविरुद्ध चिथावणी दिली तसेच जनतेमध्ये भीती निर्माण करून सार्वजनिक शांतता भंग केली म्हणून या विरुद्ध विहिंप, बजरंग दलाचे लक्ष्मण बबन साखरे यांनी करमाळा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईल स्टेट्सवर पाकचा झेंडा
वाई : वाई तालुक्यातील जांभळी येथील तरुणास मोबाईल स्टेट्सवर पाकिस्तानचा झेंडा ठेवणे महागात पडले आहे. भारताविरोधी मजूकर आणि पाकिस्तानचा झेंडा मोबाईलवर स्टेट्स ठेवल्याने वाई पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. शुभम दशरथ कांबळे (२३, रा. जांभळी, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी संकेत सुरेश चिकणे (रा. सोनगिरवाडी, ता. वाई) यांनी फिर्याद दिली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR