16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeआरोग्यमुंबईत उभारले १६५ कोटींचे कुत्र्यांसाठी हॉस्पिटल, रतन टाटा यांची ८६व्या वर्षी स्वप्नपूर्ती!

मुंबईत उभारले १६५ कोटींचे कुत्र्यांसाठी हॉस्पिटल, रतन टाटा यांची ८६व्या वर्षी स्वप्नपूर्ती!

मुंबई : उद्योगपती रतन टाटा यांनी ८६व्या वर्षी त्यांचं सर्वात मोठे स्वप्न पूर्ण केले. सुमारे ३८०० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक असलेले रतन टाटा हे जगभरातील सर्वात प्रसिद्ध भारतीय उद्योगपतींपैकी एक आहेत. ते प्राणीप्रेमी म्हणूनही ओळखले जातात, त्यांना कुत्र्यांबद्दल विशेष प्रेम आहे.

रतन टाटा पुढील महिन्यात भारतातील सर्वात मोठ्या पशु रुग्णालयांपैकी एक रुग्णालय सुरू करणार आहेत. रतन टाटा यांनी त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ड्रीम प्रोजेक्टची माहिती देताना सांगितले,

रतन टाटा Tata Trusts Small Animal Hospital या नावाने पेट प्रोजेक्ट मुंबईत उभा करत आहेत आणि यासाठी त्यांनी १६५ कोटी रुपये खर्च केले आहेत. २.२ एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे आणि येथे हे कुत्रे, मांजर, ससे आणि इतर लहान प्राण्यांसाठी असलेल्या मोजक्या रुग्णालयांपैकी एक असेल आणि ते २४ तास सुरू असेल.

रतन टाटा यांच्या प्राण्यांसाठीच्या नवीन रुग्णालयाने प्रशिक्षणासाठी रॉयल व्हेटर्नरी कॉलेज लंडनसह यूकेच्या पाच पशुवैद्यकीय शाळांसोबत भागीदारी केली आहे. या रुग्णालयात प्राण्यांवर शस्त्रक्रिया, निदान आणि फार्मसी सेवा देण्यात येणार आहे. चार मजली रुग्णालयात २०० रुग्णांची क्षमता असेल आणि हे सर्व ब्रिटीश पशुवैद्य थॉमस हिथकोट यांच्या देखरेखीखाली कार्यान्वित असेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR