पुणे: मशिदीमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. पुण्याच्या कोंढवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मशिदीमध्ये नमाज पठण करायला गेलेल्या नऊ वर्षाच्या मुलावर मशिदीतील कर्मचा-याकडून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १० नोव्हेंबर २०२३ रोजी हा प्रकार घडला आहे.
पीडित मुलाच्या मामाने याबाबत पोलीस ठाण्यात तकार दिल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर संतापाची लाट उसळली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मोहम्मद युसुफ असे गुन्हा दाखल असलेल्या कर्मचा-याचे नाव आहे.
आरोपीवर पोक्सो अंतर्गत कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलाच्या मामाने ह प्रकार उघडकीस आल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात याबाबत बुधवारी फिर्याद दिली आहे. सध्या पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपी सध्या फरार आहे.