22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeपरभणीन्यायासाठी मृतदेह पोलिस ठाण्यात आणणा-यांवरच गुन्हा दाखल

न्यायासाठी मृतदेह पोलिस ठाण्यात आणणा-यांवरच गुन्हा दाखल

जिंतूर : तालुक्यातील वरूड येथील एका वृध्दाचा डीवायएसपीच्या गाडीचा धक्का लागून जखमी झाल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात न्याय देऊन दोषींवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मयताच्या नातेवाईकांनी गुरुवार, दि.२२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास मृतदेह ंिजतूर पोलीस ठाण्यात आणत आक्रोष केला. या प्रकरणात मृतदेहाची हेळसांड करून अवहेलना करत विटंबना केल्याने ५० जणांवर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरुड नृंिसह येथील ग्रामस्थ दत्ता बन्सी डोंबे (वय ५६ वर्ष) यांचा पोलीस अधिका-याच्या वाहनाचा धक्का लागून अपघात झाला होता. या जखमीचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी मयताचा मृतदेह ंिजतूर पोलीस स्थानकामध्ये आणला. शासकीय वाहनाचे चालक तसेच डीवायएसपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी नातेवाईकांनी केली. यावेळी संतप्त नातेवाईक, पोलीसांमध्ये बाचाबाची झाली. शवविच्छेदनानंतर चार तास मृतदेह पोलीस स्थानकाच्या प्रांगणात ठेवल्याने मृतदेहाची अवहेलना झाली, त्यामुळे पोलीसांनी गुन्हा नोंदविला आहे. गैर कायद्याची मंडळी जमवून मृतदेह पोलीस ठाण्यात आणून घोषणा देत मृतदेहाची हेळसांड करून अवहेलना केल्याप्रकरणी उध्दव डोंबे, विवेक विटे, प्रकाश लाटे, अंबादास ताटे, महादेव ताटे, महादेव जाधव, ंिलबाजी ताटे, गणेश वाघ, बालु थिटे, पप्पु ताटे, रामा थिटे, तुळशीराम विटे, विलास थिटे, विश्वनाथ थिटे, राजु लटे,चिंगु ताटे, भागवत ताटे, रंगनाथ काळदाते, रजित वाघ, पिणु रामचंद्र थिटे, श्रीहारी डोंबे, नगहरी डोंबे, मुंजाभाऊ डोंबे, दत्ता डोंबे, अक्षय थिटे, लक्ष्मण थिटे, नारायण शेन्द्रे, ज्ञानोबा साबळे, गोंिवद डोंबे, लक्ष्मण बुधवंत, आकाश चराटे, बाबुराव बिटे, अरुण थिटे, बालासाहेब राऊत, सुदाम तळपटे, राजु माऊ मानकरी थिटे, गणेश घुले, शिवराज राजेंद्र थिटे, वैभव ताटे, माणिक रावसाहेब डोंबे, राहुल राजेभाऊ बिटे, अजय महादेव थिटे, संतोष रंगनाथ राऊत, अंकुश सिताराम राऊत, सोपान वामन राऊत, बबन छनन बिटे, देविदास बिटे, गणेश भगवान काकडे व इतर २ लोक सर्व रा. वरुड ता. ंिजतुर यांच्या विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक दिक्षा चंपतराव लोकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सपोनि सय्यद यांचेकडे देण्यात आला आहे. परंतू न्यायासाठी मृतदेह पोलिस ठाण्यात आणणा-यांवरच गुन्हा दाखल करण्यात आल्याने सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR