35.9 C
Latur
Tuesday, May 14, 2024
Homeक्रीडाहैदराबादचा दारूण पराभव

हैदराबादचा दारूण पराभव

चेन्नई : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सनेसनरायझर्स हैदराबादचा दारूण पराभव केला. हैदराबादला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. तुषार देशपांडेच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर चेन्नईने ७८ धावांनी विजय मिळवत दोन गुण मिळवले. आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ४६ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने होते. मराठमोळ्या खेळाडूंनी चेन्नईसाठी किल्ला लढवला. कर्णधार ऋतुराज गायकवाडने ९८ धावांची अप्रतिम खेळी केली. तर २१३ या धावांचा बचाव करताना तुषार देशपांडेने सर्वाधिक ४ बळी घेतले. अखेर हैदराबादचा संघ निर्धारित २० षटके देखील खेळू शकला नाही आणि १८.५ षटकांत १३५ धावांवर सर्वबाद झाला. सर्वाधिक धावा करणाऱ्या ऋतुराजला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

तुषार देशपांडेने चेन्नईसाठी अप्रतिम कामगिरी करताना ३ षटकांत २७ धावा देत चार बळी घेतले, तर मथीक्क्षा पथिराना आणि मुस्तफिजुर रहमान यांना २-२ बळी घेता आले. याशिवाय रवींद्र जडेजा (१) आणि इम्पॅक्टच्या रूपात आलेल्या शार्दुल ठाकूरने (१) बळी घेऊन चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. चेन्नईने ७८ धावांनी मोठा विजय मिळवल्याने त्यांचा नेट रनरेटही चांगला वाढला.

चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या हैदराबादच्या संघाकडून कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. एडन मार्करमने सर्वाधिक ३२ धावा केल्या, तर ट्रॅव्हिस हेड (१३), अभिषेक शर्मा (१५), अनमोलप्रीत सिंग (०), नितीश कुमार रेड्डी (१५), हेनरिक क्लासेन (२०), अब्दुल समद (१९), शाहबाज अहमद (७), पॅट कमिन्स (५), जयदेव उनाडकट (१) आणि भुवनेश्वर कुमार (४) धावा करून नाबाद परतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR