16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीविद्यार्थीनींना अश्लिल बोलणारा शिक्षक निलंबीत

विद्यार्थीनींना अश्लिल बोलणारा शिक्षक निलंबीत

मानवत : येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनींना अश्लिल भाषेत बोलणा-या प्राथमिक शिक्षक दत्ता गंगाधर होगे याच्या विरूध्द मानवत पोलिस स्थानकात पोस्कोंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांनी दि. ३ रोजी शिक्षक होगे याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दरम्यान शिक्षक होगे याला अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे समजते.

मानवत येथील मोंढा परिसरातील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक पदवीधर शिक्षक दत्ता होगे(४५) आहे. या शिक्षकाविरुद्ध शाळेतील तक्रार पेटीत इयत्ता ८ वीच्या अनेक विद्यार्थिनींनी तक्रारी टाकल्या होत्या. याची दखल घेत मुख्याध्यापिका छाया उमाजी गायकवाड (वय ५२) रा. लोकमान्यनगर, परभणी यांनी दि. २ रोजी मानवत पोलिस ठाण्यात संबंधीत शिक्षक होगे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून शिक्षक होगे यांच्यावर पोस्कोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माथूर यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा वर्तणूक नियम ३ (१) (ब) नुसार जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे. या कालावधीत त्याचे मुख्यालय पालम पंचायत समिती असणार आहे. दरम्यान या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली असून शिक्षक होगे यांना पोलिस कधी अटक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR