24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयआपचे आमदार जसवंत सिंग यांना ईडीने घेतले ताब्यात

आपचे आमदार जसवंत सिंग यांना ईडीने घेतले ताब्यात

चंदीगड : पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या (आप) आणखी एका आमदाराच्या अडचणीत वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आप आमदार जसवंत सिंह गज्जन माजरा यांना ताब्यात घेतले आहे. जसवंत सिंह गज्जन माजरा अमरगढचे आमदार आहेत. गज्जन माजरा कामगारांची बैठक घेत असताना ईडीने त्यांना ताब्यात घेतले आहे. ईडीची टीम त्यांना जालंधरला घेऊन गेली आहे. जसवंत सिंह यांच्यावर ४० कोटी रुपयांची बँक फसवणूक केल्याचा आरोप आहे. एजन्सीने यापूर्वीही अनेकदा त्यांचा तपास केला आहे.

यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जसवंत सिंह गज्जन माजरा यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. सुमारे १४ तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर ईडीच्या पथकाने त्यांच्या घरातून ३२ लाख रुपये रोख आणि तीन मोबाइल फोन जप्त केल्याचे माजरा यांनी सांगितले होते. आप’चे आमदार जसवंत सिंह गज्जन माजरा तेव्हा प्रसिद्धीझोतात आले, जेंव्हा त्यांनी आमदार म्हणून मिळणाऱ्या पगारातील फक्त एक रुपया घेणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात त्यांनी प्रतिज्ञापत्रही दिले होते. त्यावर बरीच चर्चा झाली.

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते मलविंदर कांग म्हणाले की, अमरगाह येथील आम आदमी पक्षाच्या आमदाराला जाहीर सभेतून का ताब्यात घेण्यात आले, हे समजू शकलेले नाही. ‘आप’मध्ये येण्यापूर्वी त्यांना अडचणीचा सामना करावा लागत होता. यामुळे आमची बदनामी होत असून हे भाजपचे षड्यंत्र आहे. सार्वजनिक सभेदरम्यान ईडीने ज्या प्रकारे त्यांना ताब्यात घेतले, ते भाजपची ‘आप’ला बदनाम करण्याची रणनीती दर्शवते, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR