37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्र९३च्या स्फोटातील आरोपी किर्तीकरांच्या प्रचार रॅलीत

९३च्या स्फोटातील आरोपी किर्तीकरांच्या प्रचार रॅलीत

मुंबई : १९९३ मध्ये मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी इब्राहिम मूसा हा वायव्य मुंबईतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारामध्ये सहभागी होता असा दावा करण्यात आला आहे. पश्चिम उत्तर मुंबईचे मविआचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचारावेळी इब्राहिम मूसा उपस्थिती होता असा दावा करण्यात आला. यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.

भारतीय जनता पक्षाने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. अमोल कीर्तीकर बुधवारी रॅली घेत होते. यावेळी मूसा त्यांच्या प्रचारात सहभागी होता असा दावा भाजपने केला आहे. भाजपचे आमदार अमित साटम यांनी या मुद्द्यावरुन अमोल कीर्तीकर आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. अंधेरी वेस्ट याठिकाणी प्रचार करताना कीर्तीकरांच्या सभेत मूसा उपस्थित होता असा दावा करण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR