23.7 C
Latur
Friday, January 17, 2025
Homeसोलापूरअहिल्यादेवी सिंचन विहीर योजना, ६८८५ शेतकऱ्यांचे प्रस्ताव

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना, ६८८५ शेतकऱ्यांचे प्रस्ताव

सोलापूर : अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेंतर्गत पाच हजार ५७३ विहिरींच्या कामांनना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यापैकी ५० टक्के म्हणजेच दोन हजार ४४७ कामेच सुरू आहेत. दीड एकर ते पाच एकर क्षेत्र असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर योजना राबविण्यात येते. या योजनेतून शेतकऱ्याला विहीर खोदण्यासाठी चार लाखांचे अनुदान दिले जाते. या योजनेतून ६० टक्के कामे मजुरांमार्फत तर ४० टक्के कामे यंत्राद्वारे करण्याचे बंधन आहे.

ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची आहे. त्यामुळे राज्य सरकारने या योजनेसाठी असलेली दोन विहिरींमधील १५० फुट अंतराची अटही रद्द केली आहे. जिल्ह्यातील सात हजार १३० शेतकऱ्यांनी विहिरीची मागणी केली होती. त्यापैकी सहा हजार ८८५ शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिला होता. त्यातील पाच हजार ५७३ विहिरींच्या कामांना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यातील दोन हजार ४४७ विहिरींचेच काम सुरू आहे.

यात सर्वाधिक ६१० माढा तालुक्यातील तर त्या खालोखाल ५२३ बार्शी तालुक्यातील विहिरींची संख्या आहे. दरम्यान शेतकऱ्याकडून मात्र, विहिरींची मागणी होत असून प्रस्ताव तत्काळ मंजुरीची गरज आहे. सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट २१८,बार्शी ५२३,करमाळा ९१,माढा ६१०,माळशिरस २०८,मंगळवेढा १२९,मोहोळ ७३,पंढरपूर ३०७,सांगोला १०६,दक्षिण सोलापूर ११३,उत्तर सोलापूर ६९,अशा एकूण २४४७ विहीरींचे काम सुरू आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR