पूर्णा : तालुक्यातील मौजे पिंपरण येथे सद्गुरू वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड शिवनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथराज परमरहस्य पारायण सोहळा अखंड शिवनाम सप्ताह दि.३ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत असून मागील ४६ वर्षापासून अखंड शिवनाम सप्ताह आयोजन करण्यात येत आहे.
या शिवनाम सप्ताहात शिवाचार्य सद्गुरू १०८ ष.ब्र.प. साप शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत, ष.ब्र.प.सद्गुरु नंदकिशोर शिवाचार्य महाराज पूर्णा, ष.ब्र.प.करबसव शिवाचार्य महाराज लासीना मठ वसमत, वेदांत चार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत, गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज गिरगाव, विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज आष्टी (लक्ष्मणाची) यांच्या प्रवचनाचा लाभ होणार आहे.
दि.३ नोव्हेंबर रोजी शि.भ.प.किशोरीताई ताडबीडकर, शि.भ.प गणू महाराज स्वामी, दि.४ रोजी शि.भ.प नागेश महाराज कुरुंदवाडीकर, शि.भ.प व्यंकट सोनटक्के, दि ५ शि.भ.प राजेश्वर स्वामी लहाळीकर, शि.भ.प संतोष भंडारे, दि.६ शि.भ.प चंद्रकांत अमलापुरे, शि.भ.प. सदाशिव धोंडे, दि.७ शि.भ.प संगीता ताई पाटील बेंद्रीकर, शि.भ.प देवजी नरवाडे, दि.८ रोजी शि.भ.प अमोल महाराज लांडगे बनवस, शि.भ.प वैजनाथ नरवाडे, दि.९ रोजी शि.भ.प दत्ता सोनटक्के यांचे टाळ आरती वरील किर्तन, सद्गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन होणार आहे. रात्री शि.भ.प बालाजी पाटील वेरुळकर यांचे कीर्तन होणार आहे. शिवनाम सप्ताहात दैनंदिन कार्यक्रम सकाळ ५ ते ६ शिवपाठ, ६ ते ७ पिंपळेश्वरचा रुद्राभिषेक व सकाळी ८ ते ११ सामूहिक परमहस्य पारायण व प्रवचन, दुपारी २ ते ६ गाथ्यावरील भजन व लगेचच गाथापोथी प्रवचन, रात्री ८ ते ११ किर्तन व शिवजागर होणार आहे. सकाळ व संध्याकाळच्या सत्रात अन्नदात्यांचे अन्नदान होणार आहे.
दि.९ नोव्हेंबर रोजी ग्रामदैवत पिंपळेश्वर पालखी व ग्रंथराज परमहंस ग्रंथाची गावातून भव्य दिव्य मिरवणूक निघणार आहे. दि.१० रोजी शि.भ.प.संजय महाराज येळापुरी लिंबाळवाडी यांचे कीर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. परम रहस्य पारायण याचे संयोजक शि.भ.प गणु महाराज स्वामी, शि.भ.प चंद्रशेखर स्वामी अखंड शिवनाम सप्ताहाला भाविक भक्तांनी उपस्थित रहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अवाहन पिंपरण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.