39.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरश्री अन्न उत्कृष्टता केंद्र पळविणाऱ्या शासन निर्णयाची संभाजी आरमारने केली होळी

श्री अन्न उत्कृष्टता केंद्र पळविणाऱ्या शासन निर्णयाची संभाजी आरमारने केली होळी

सोलापूर : संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. पौष्टिक तृणधान्यांचे लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन व उत्पादकता वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. सोलापूर जिल्हा हा रब्बी पिकांचा जिल्हा असून विशेषतः ज्वारी आणि बाजरी या तृणधान्यासाठी १७ एप्रिल २०२३ च्या शासन निर्णयासाठी सोलापूर जिल्ह्यात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मात्र २४ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार सदर केंद्र बारामती येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.नैसर्गिक न्याय तत्वानुसार या केंद्रावर सोलापूरचा प्रथम हक्क असूनदेखील सोलापूरचे हे कडनेरा बारामतीला पळविण्याचा अन्यायकारक निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला आहे. सोलापूरचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र रद्द करून बारामतीला पळवून नेण्याच्या शासन निर्णयाची होळी करून संभाजी आरमारने राज्य सरकारचा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध केला.

याप्रसंगी बोलताना संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून देखील केवळ बारामतीचाच विचार करतात हे खेदजनक बाब असल्याचे सांगत. ज्या जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला २ खासदार, ६ आमदार, जिल्हा परिषद-महापालिकेची एकहाती सत्ता दिली त्या भारतीय जनता पक्षाने सोलापूरकरांच्या मताचा आदर राखत सोलापूरकरांच्या हक्काचे श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सन्मानपूर्वक सोलापूरला बहाल करावे असे आवाहन केले.

याप्रसंगी संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रदेश संघटक प्रकाश डांगे, सरचिटणीस गजानन जमदाडे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, शहरप्रमुख सागर ढगे, शहर संघटक राज दवेवाले, उपजिल्हाप्रमुख राजेश पाटील, संपर्कप्रमुख गिरीश जवळकर, विभागप्रमुख द्वारकेश बबलादीकर, सागर दासी, संतोष कदम, स्वप्नील इराबत्ती, सुधाकर करणकोट, बाळासाहेब वाघमोडे, राजू रच्चा, व्यंकटेश मद्राल आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR